अस्पृश्यता आणि गांधीजी
गांधीजींच्या मृत्यूनंतर मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे भारतीय नेत्यांनी दुर्लक्ष केले असे म्हणणे भाग पडते. म. गांधींनंतर या प्रश्नाकडे जिव्हाळ्याने कोणीच पाहिना म्हणून पुन्हा हा प्रश्न तसाच रेंगाळत मागे पडला आहे असे म्हणावे लागते. गांधीजींनी निर्माण केलेली या प्रश्नासंबंधीची परंपरा खंडित झालेली आहे, हीच या प्रश्नाची आज शोकांतिका आहे.......